Place 4-5 chakalis on a paper towel. Microwave for 40 seconds on high power. Take them out and let them cool down for 2-3 minutes. They become crunchy and ooze out oil. The paper towel will absorb this excessive oil.
४-५ नरम चकल्या पेपर टॉवेलवर ठेवा. मायक्रोवेव्हमध्ये हाय पॉवरवर ४० सेकंद गरम करा. बाहेर काढून २-३ मिनिटे गार होवू द्यात. चकल्या कुरकुरीत होतात. तसेच चकल्यातील तेलही बाहेर पडते जे पेपर टॉवेल शोषून घेतो.
Thursday, December 22, 2011
Friday, December 16, 2011
Save time when making Sooji recipes
Most sooji recipes like umpa, sheera, sanja demand dry roasting sooji. Therefore, dry roast Sooji in a good quantity. Let it cool down and store it in an airtight jar. It comes handy when you need and saves time.
रव्याच्या बहुतेक सर्व पाककृतींसाठी (जसे उपमा, शिरा, सांजा इत्यादी) रवा भाजावा लागतो. म्हणून रवा थोड्या जास्त प्रमाणात भाजून घ्यावा. थंड झाला कि बरणीत भरून ठेवून द्यावा. जेव्हा गरज वाटेल तेव्हा हा रवा वापरत आणता येईल. आणि त्यावेळी रवा भाजायला लागणारा वेळ वाचेल.

Friday, December 9, 2011
Using Leftover dal
If you have leftover dal in your refrigerator, use it to make tasty parathas. Add it to wheat flour, adjust the seasonings and knead the dough. It will make delicious parathas.
फ्रीजमध्ये जर उरलेली आमटी असेल तर ती वापरून पराठे बनवता येतील. गव्हाच्या पिठात आमटी घालावी. लागल्यास मीठ-तिखट घालावे. पीठ मळावे. यापासून चविष्ट असे पराठे बनवता येतील.
फ्रीजमध्ये जर उरलेली आमटी असेल तर ती वापरून पराठे बनवता येतील. गव्हाच्या पिठात आमटी घालावी. लागल्यास मीठ-तिखट घालावे. पीठ मळावे. यापासून चविष्ट असे पराठे बनवता येतील.
Wednesday, November 30, 2011
Cooking Split lentils (dals)
जुन्या डाळी (शक्यतो चणा किंवा तूर डाळ) जास्त कोरड्या झाल्याने चटकन शिजत नाहीत. अशावेळी डाळ शिजवण्यापुर्वी तासभर पाण्यात भिजत ठेवावी. डाळ भिजवल्याने प्रेशर कुकरमध्ये नेहमीच्या वेळेपेक्षा डाळ पटकन शिजते.
Thursday, November 24, 2011
Prevent Curdling of yogurt in cooking
Bring the yogurt to room temperature before using. To temper or help stabilize the yogurt, you can stir in corn starch or all purpose flour (Rice flour or Chickpea flour in Indian cooking) in every 1/3 cup of yogurt. For best result, gently stir yogurt rather than beating it, and add it over low heat at the end of cooking.
कुठल्याही रेसिपीमध्ये दही वापरायचे असल्यास आधी दही रूम टेम्परेचरला आणावे. गरज वाटल्यास १/३ कप दह्यात, रेसिपीला अनुरूप असे १ टीस्पून पीठ घाला (कॉर्न स्टार्च, मैदा, तांदुळाची पिठी, किंवा बेसन) घालावे. दही जोरजोरात फेटण्याऐवजी हलकेच मिक्स करा आणि पदार्थ मंद आचेवर ठेवून रेसिपीच्या शेवटी दही त्यात मिक्स करा.

Wednesday, November 16, 2011
Using Raw Onion in recipes
If you are using raw onion in any recipe (eg. salsa or guacamole) and you are not going to eat that food in the next 15-20 minutes, then rinse the diced onion with cold water and blot dry. This will rid them of sulfurous gas that can ruin dish.
कोणताही पदार्थ बनवताना त्यात कच्चा कांदा वापरणार असाल (उदा. सालसा, ग्वाकामोले) आणि बनवल्यावर जर १५-२० मिनिटात तो खाणार नसाल तर, आधी चिरलेला कांदा गार पाण्याखाली हलकेच धुवून घ्यावा. आणि पेपर टॉवेलने टिपून घ्यावा. कच्च्या कांद्यामधील सल्फरस गॅसमुळे पदार्थ बराच काळ तसाच ठेवल्यास पदार्थाची चव बिघडते. कांदा धुवून घेतल्याने हि शक्यता संभवत नाही.

Wednesday, November 2, 2011
Care to take while Handling Chilies
मिरची चिरताना जर हाताची जळजळ होत असेल तर मिरची चिरायच्या आधी बोटांना थोडे तेल लावून घ्यावे. यामुळे मिरचीमधील तिखटपणा त्वचेच्या थेट संपर्कात येणार नाही.
Friday, October 28, 2011
How to section an Orange
1)Remove the peel
2) Hold the orange over a bowl to catch the juice, cut between one orange section and membrane, slicing to the center of the fruit.
3) Turn the knife and slide it up the other side of the section alongside the membrane
4) Repeat with remaining sections.
Wednesday, October 19, 2011
Mandoline - helpful and time saver
Its easy and safe to use. You hold the food in a protective carriage to keep your fingers away from the sharp blade. (be careful while cleaning the blades)
Vegetable Sandwich Recipe
मँडोलिन या उपकरणाचा चिरण्यासाठी आणि स्लाईसिंगसाठी स्वयंपाकघरात खूप उपयोग होतो. भाज्या, फळं किंवा चीज जी फर्म असतात [जसे बटाटा, काकडी, मुळा, कांदा, सफरचंद, भोपळी मिरची, बीट इत्यादी] त्यांचे एकसमान तुकडे, किंवा पातळ / जाड चकत्या, फिंगर चिप्स या उपकरणाद्वारे साध्य करता येतात.
मँडोलिन वापरणे सोपे आणि सुरक्षित असते. 'प्रोटेक्टीव कॅरीएज'(photo) मध्ये पदार्थ धरून तुम्ही तुमच्या बोटांचे धारदार ब्लेड्स पासून संरक्षण करू शकता. (महत्त्वाची टीप: ब्लेड्स धुताना हात कापणार नाही याची काळजी घ्यावी.)
व्हेजिटेबल सॅन्डविच रेसिपी
Wednesday, October 12, 2011
How to clean mushrooms
Wipe the fresh mushrooms with a clean damp cloth. Avoid rinsing under running water. If you must rinse them, do it lightly, then dry them immediately and gently with paper towels. A mushroom absorbs water like a sponge.Hence, Never soak fresh mushrooms in water. It ruins their texture.फ्रेश मश्रूम स्वच्छ, (घट्ट पिळलेल्या)ओल्या कपड्याने पुसून काढा. मश्रूम पाण्यात धुवायचे टाळा. जर पाण्यात धुवावे लागणारच असतील तर अगदी हलकेच पाण्यात साफ करा आणि लगेच पेपर टॉवेलने टिपून घ्या. मश्रूम स्पंजप्रमाणे पाणी शोषून घेतात. त्यामुळे मश्रूम वापरून जो काही पदार्थ बनवणार असाल तो बिघडेल. म्हणून मश्रूम थेट पाण्यात धुवायचे टाळा.
Friday, October 7, 2011
Choosing Knives
Usually, 3 types of knives are useful in the kitchen:-
1) Chef's Knife - for chopping and dicing

2) Paring Knife - for paring

3) Serrated Knife - for slicing bread, tomatoes
1) Chef's Knife - for chopping and dicing
2) Paring Knife - for paring
3) Serrated Knife - for slicing bread, tomatoes
Wednesday, September 28, 2011
How to store Chicken
Keep the chicken in it's original packaging and store it in the coldest part of the refrigerator (bottom, towards the back) for no more than one or two days. If you are not planning to eat it within two days, freeze it in it's original packaging.
चिकन फ्रीजमध्ये स्टोअर करताना त्याच्या मूळ सीलबंद पॅकेटमध्येच असू द्यावे आणि फ्रीजमधील एकदम थंड जागी ठेवावे(तळाच्या कप्प्यात मागील बाजूस). एक ते दोन दिवसात चिकन वापरात आणावे. जर १-२ दिवसात वापरायचे नसल्यास लगेच फ्रीजरमध्ये फ्रीज करावे.

Wednesday, September 21, 2011
How to Store Soup
Cool the soup before transferring to freezer-safe airtight plastic containers. Leave some space for expansion. Label the date and freeze upto 3 months.
जवळजवळ सर्वच प्रकारची सूप्स फ्रीजरमध्ये स्टोअर करता येतात. सूपमध्ये जर दुग्धजन्य पदार्थ घालणार असाल जसे चीज, दुध, क्रीम, किंवा दही तर ते न घालता सूप बनवावे. कारण फ्रीजरमधील गोठलेले सूप वितळवताना हे पदार्थ सेपरेट होतात.
सूप फ्रीजरमध्ये ठेवण्यापूर्वी ते पूर्णतः गार होवू द्यावे. नंतर फ्रिजरमध्ये चालतील असे एअरटाईट प्लास्टिक कंटेनरमध्ये सूप भरावे. सूप गोठल्यावर प्रसारण पावेल म्हणून एकदम वरपर्यंत सूप भरू नये. थोडी जागा मोकळी सोडावी. कंटेनरवर तारीख घालावी. ३ महिन्यांपर्यंत सूप वापरात आणावे.
Thursday, September 15, 2011
How to choose an Eggplant
वांगे निवडताना आधी सारख्या आकाराची वांगी हातात घेउन वजनाचा अंदाज घ्यावा. जे जास्त जड लागेल असे वांगे निवडावे. अंगठ्याने (नख लावू नये) हलकेच वांग्याला थोडे दाबून पहावे. जर स्पंजप्रमाणे दबलेला भाग मुळपदावर आला तर वांगे नीट पिकलेले व ताजे आहे. आणि जर दाबल्या ठिकाणी डेंट तसाच राहिला तर वांगे शिळे आहे असे समजावे. वांग्याची पाठ जांभळी आणि तकाकदार असावी. तसेच गुळगुळीत आणि फर्म असावी. हिरवा टोपीसारखा भाग आणि शेंडी अखंड असावी आणि त्यावर बुरसा आलेला नसावा.
Wednesday, September 7, 2011
How to bake food evenly
Most ovens heat unevenly. Try rotating baking pans from top to bottom and front to back atleast once during baking time.
बराचशा ओव्हनमध्ये सर्वत्र सारखी उष्णता निर्माण होत नाही, पदार्थ अनइव्हन बेक होतो. तेव्हा बेक करताना बेकिंग पॅन एकदा तरी रोटेट करावा. म्हणजे पदार्थ सारखा बेक होईल.
बराचशा ओव्हनमध्ये सर्वत्र सारखी उष्णता निर्माण होत नाही, पदार्थ अनइव्हन बेक होतो. तेव्हा बेक करताना बेकिंग पॅन एकदा तरी रोटेट करावा. म्हणजे पदार्थ सारखा बेक होईल.
Wednesday, August 31, 2011
How to cut and seed a Pomegranate
ii) Score the pomegranate into four to five sections.
iii) Put it into a bowl of cold water.
iv) Break the pomegranate in chunks by gently pulling it apart with your fingers.
v) Roll the seeds out of the membrane with your fingers
vi) Membranes will float up to the top of water. Remove it with strainer.
vii) Now, strain the pomegranate seeds. They are ready to enjoy!!
i) देठाकडचा भाग कापून टाकावा.
ii) सालाला वरचेवर, एक इंचाच्या अंतराने उभ्या अशा ४ ते ५ चिरा द्याव्यात. (खूप खोल चिरू नये)
iii) आता डाळिंब गार पाण्यात बुडवावे.
iv) बोटांनी डाळिंबाचे मोठे तुकडे करावेत.
v) बोटं फिरवून आतील बिया मोकळ्या कराव्यात.
vi) सर्व्ह डाळिंब साफ करून झाले कि दालीम्बाच्या आत जी पांढरी पटलं असतात (मेम्ब्रेन) ती पाण्यावर तरंगातील. ती गाळण्याने काढून टाकावीत.
vii) चाळणीवर टाकून पाणी निथळून टाकावे आणि डाळिंबाचे दाणे वापरावेत.
Sunday, August 28, 2011
How to cut an avocado
प्रथम अवोकॅडोच्या देठाकडील भाग थोडासा कापून टाकावा. मोठी सुरी घेउन मधून उभा कापावा [आतमध्ये मोठी बी असेल त्याच्या भोवतालहून कापावे]. विलग करण्यासाठी दोन्ही अर्धे भाग विरुद्ध दिशेला ट्विस्ट करावे. एका भागावर बी असेल. बी काढण्यासाठी तो भाग आधी कटिंग बोर्डवर ठेवावे. मध्यम जोर देवून सुरी बीमध्ये रुतावावी आणि हलकेच ट्विस्ट करावी. बी सुरीला धरून बाहेर येईल. अवोकॅडोचा गर चमच्याने काढावा.
Friday, August 26, 2011
Testing purity of Honey
एका ग्लासमध्ये पाणी घ्या. त्यात १ चमचा मध घाला. जर मध शुद्ध नसेल तर पाण्यात विरघळेल [बऱ्याचदा मधामध्ये भेसळ करताना काकवीचा वापर करतात जी पाण्यात विरघळते.] जर मध शुद्ध असेल तर ग्लासमध्ये तळाला जावून चिकटते.
Wednesday, August 10, 2011
Storing leftover coconut Milk
To store leftover coconut milk. Pour them in ice cubes tray and freeze. Thaw them before using. (After thawing it will appear separated, just stir it little)
उरलेले नारळाचे दुध स्टोअर करण्यासाठी आईस क्यूब ट्रेमध्ये भरून फ्रीझरमध्ये ठेवावे. जेव्हा कधी वापरायचे असतील तेव्हा रूम टेम्परेचरला आणून मग वापरावे. (रूम टेम्परेचरला आल्यावर नारळाचे दुधातील स्निग्घांश आणि पाणी सेपरेट झाल्याचे दिसेल. वापरताना ढवळून वापरावे.)

Thursday, August 4, 2011
How to crack a coconut without any hassle
Put coconut into the freezer for one hour before cracking it. Then use hammer or stainless steel pestle to crack the shell. You will get edible part of the coconut (You may peel the skin). Poke it with a knife and save the coconut water in a bowl. Then grate or grind the white flesh.
नारळ फोडण्यापूर्वी तासभर फ्रीझरमध्ये ठेवावा. नंतर हातोडा किंवा स्टीलच्या बत्त्याने बाहेरील कवच फोडावे. आतमध्ये नारळाचा गोटा मिळेल. तो सोलून घ्यावा. सुरीने मध्यमसर भोक पाडून आतमधील पाणी एका भांड्यात काढून घ्यावे. हा सोललेला नारळ चटणीसाठी वापरायचा असल्यास मिक्सरमध्ये बारीक वाटावा. किंवा मध्यम भोकाच्या किसणीवर किसून भाजी, आमटीमध्ये वापरावा.

Wednesday, July 27, 2011
Preparation before cooking
A tip for cooking great food everytime! This is especially useful when you try a new recipe. Keep all the ingredients ready. Do all the chopping and cutting, measure out the ingredients before proceeding to actual cooking. Also, keep the written recipe with you for your reference. This way, you won't miss any ingredient and your dish will be a success for sure.
प्रत्येकवेळी पदार्थ चविष्ट बनण्यासाठी एक महत्त्वाची टीप! खासकरून नवीन पाककृती बनवताना जास्त उपयोगी. पाककृती बनवायला सुरुवात करण्याआधी लागणारे सर्व साहित्य तयार ठेवा. गरजेचे जिन्नस चिरून ठेवावेत, सर्व साहित्य मापून ठेवावे. तसेच रेफरन्ससाठी लिहिलेली पाककृती जवळ ठेवावी. अशाप्रकारे कोणताही घटक वापरायचा चुकणार नाही, आणि पदार्थ नक्की यशस्वी होईल.

Wednesday, July 20, 2011
How to clean Cilantro (Coriander)
प्रथम कोथिंबीर निवडून घ्यावी. मोठ्या पातेल्यात गार पाणी भरावे आणि त्यात निवडलेली कोथिंबीर घालावी. हाताने हलकेच ढवळावे आणि कोथिंबीर थोडावेळ तशीच ठेवावी. कोथिंबीरीतील माती, घाण तळाला बसेल आणि कोथिंबीर पाण्यावर तरंगेल जी हाताने सहज काढता येईल. जर अजून कचरा आहे असे जाणवले तर परत हीच कृती करा.
Saturday, July 9, 2011
Ginger-Garlic Proportion in curries
When using both ginger and garlic for making curries (usually north Indian curries), use 60% garlic and 40% ginger. If ginger overpowers, the curry will taste pungent and unpleasant.
Thursday, July 7, 2011
Cooking Meat
Allow meat to stand at room temperature atleast for an hour before cooking. It will cook more quickly, brown more evenly, and stick less when pan-fried.
Thursday, June 23, 2011
Prevent Egg Shells From Cracking.
अंड उकडताना कवचाला तडा जावू नये म्हणून पाण्यात एक चिमटी मीठ घालावे. आणि मग त्यात अंड उकडावे.
Wednesday, June 15, 2011
Tip for Pooranpoli
- Soak chana dal in water for 4-5 hours before pressure-cooking. Chana dal takes longer to cook. Soaking makes dal to cook quicker.
- If pressure cooked without soaking, sometimes chana dal stays uncooked inside. Soaking assures that chana dal will cook completely.
- If you pressure cook chana dal with more than required amount of water, it takes longer to evaporate the excessive water. To avoid that add just enough water to cover the chana dal while pressure cooking. It takes only 3 to 4 whistles.
- पुरणपोळी करताना चणा डाळ आधी ४-५ तास भिजवून ठेवावी. चणा डाळ शिजायला वेळ लागतो, तेव्हा चणा डाळ आधी भिजवून ठेवली तर डाळ पटकन शिजते.
- न भिजवता जर डाळ शिजवली तर कधीकधी पोटात कच्ची राहते. पण डाळ भिजवल्याने डाळ छान मऊ शिजते, तसेच ३-४ शिट्ट्याच कराव्या लागतात.
- प्रेशरकुक करताना जर गरजेपेक्षा जास्त पाणी घातले तर पुरण बनवताना जास्त आटवावे लागते. त्यासाठी जर चणा डाळ भिजवलेली असेल तर प्रेशर कुकरमध्ये घाला आणि फक्त डाळ बुडेल इतपत पाणी घाला. ३ ते ४ शिट्ट्यामध्ये छान मऊ आणि कोरडी शिजते.
Wednesday, June 8, 2011
How to Store Ginger
Wash ginger-roots and let them dry. Keep a plastic freezer safe plate ready. Grate the ginger. Divide it into 1 tsp portions and place over the plastic plate. Keep very little space in between. Freeze it for couple of hours. Then remove the plate and transfer frozen grated ginger to a ziploc bag and keep it in the freezer. Ginger will stay good for atleast 2 months in the freezer. This way, using ginger will be a lot easier. Frozen ginger can be used not only in curries, vegetables but also in Tea.
आलं आधी धुवून निट वाळू द्यात. नंतर फ्रिजरमध्ये चालेल अशी एखादी ताटली घ्या. आता आलं किसून त्याचे १ टिस्पून एवढ्या आकाराचे छोटे छोटे भाग करा. ते ताटलीमध्ये मांडा. किंचीत मध्ये जागा सोडा. फ्रिजरमध्ये २ तास ठेवा. नंतर प्लेट बाहेर काढून गोठलेले आल्याचे गोळे काढून झिपलॉकच्या पिशवीत भरा. आता हि पिशवी लगेच फ्रिजरमध्ये ठेवा. आलं किमान २ महिने तरी छान राहील. अशाप्रकारे आलं वापरायलाही सोपं जाईल. हे आलं भाज्या व इतर जेवणात वापरता येईलच पण चहामध्येसुद्धा वापरले तरी चालते.

Wednesday, June 1, 2011
Give bright red color to Tomato puree
Add a small piece of beetroot while making tomato puree, it will give it a bright red color.Beetroot-Tomato Juice
टोमॅटो प्युरे बनवताना बिटाचा लहान तुकडा घालावा. यामुळे टोमॅटो प्युरेला छान लाल रंग येतो.
बिट-टोमॅटो ज्युस
Wednesday, May 25, 2011
Tip for grating cheese
Spinach and cheese Sandwich
चिज किसण्यापूर्वी किसणीला थोडे बटर लावून घ्या. म्हणजे किसताना चिज किसणीला चिकटणार नाही.
पालक आणि चिज सॅंडविच
Wednesday, May 18, 2011
Leftover Potatoes
If there are leftover potatoes, peel them before putting in fridge. Chilled potatoes are difficult to peel. Also, some potato flesh gets wasted alongwith peels. To avoid it, peel and put in a covered container. Refrigerate. Use withing 3-4 days.
Ragda Patties
Kashmiri Dum Aloo
जर बटाटे उरले असतील तर फ्रिजमध्ये टाकण्याआधी बटाट्याची साले काढावी. फ्रिजमधील थंड बटाटे सोलायला कठीण जातात तसेच सोलताना सालाबरोबर बटाट्याचा काही भाग वाया जातो. ते टाळण्यासाठी, बटाटे फ्रिजमध्ये ठेवण्यापूर्वी सोलून, बंद डब्यात ठेवावे आणि मगच फ्रिजमध्ये ठेवावे.
रगडा पॅटीस
काश्मिरी दम आलू

Wednesday, May 11, 2011
Remnant water after boiling vegetables
After cooking vegetables, do not discard the remaining water. Instead use it in sambar, soup or making gravies.
Udipi Sambar Recipe
Vegetable Soup
भाज्या शिजवल्यावर जर काही पाणी उरले असेल तर ते फेकून देऊ नये. हे पाणी सांबार, सूप किंवा ग्रेव्ही बनवताना वापरात आणावे.
उडीपी सांबार रेसिपी
व्हेजिटेबल सूप
Udipi Sambar Recipe
Vegetable Soup
भाज्या शिजवल्यावर जर काही पाणी उरले असेल तर ते फेकून देऊ नये. हे पाणी सांबार, सूप किंवा ग्रेव्ही बनवताना वापरात आणावे.
उडीपी सांबार रेसिपी
व्हेजिटेबल सूप
Monday, May 9, 2011
How to remove stickiness of Okra
When stir frying okra, add a tsp of lemon juice or 1/2 tsp of amchoor powder or couple of kokum pieces. The sourness helps to reduce the stickiness.
Stir Fried Okra
Bharwa Bhindi
परतलेली भेंडीची भाजी बनवताना किंवा इतर कोणत्याही पद्धतीने भेंडीची भाजी बनवताना, १ टिस्पून लिंबाचा रस किंवा १/२ टिस्पून आमचूर पावडर किंवा २-४ कोकमाचे तुकडे घालावे. यांतील आंबटपणामुळे भेंडीचा चिकटपणा कमी होतो.
भेंडीची परतून भाजी
भरली भेंडी

Friday, April 29, 2011
Crispy Onion Pakoda
The key to make crispy onion pakoda is do not add water to the batter. Sprinkle some salt over sliced onion. Salt helps to bring out moisture from onions. Then add spices and chickpea flour. Mix well and deep fry as usual.
Crispy Onion Pakoda
Crispy Onion Pakoda
कुरकूरीत कांदा भजीसाठी पिठ भिजवताना पाणी घालू नये. भजीचे पिठ तयार करण्यापूर्वी उभ्या चिरलेल्या कांद्यावर मिठ पेरून ठेवावे. मिठामुळे कांद्याला पाणी सुटेल. या ओलसरपणावरच तिखट, मिठ, इतर मसाले आणि बेसन घालून घट्ट भिजवावे. नेहमीप्रमाणे भजी तळाव्यात.
कांदा भजी रेसिपी
Sunday, April 24, 2011
How to release baked cake from pan
Always line the cake tin with parchment paper or wax paper. In the absence of parchment paper, grease the pan with butter. After baking, put the hot pan over wet kitchen towel. The steam created will help to loosen the cake from pan. Also, run the knife around the edge.
Eggless Sponge Cake
Eggless Dates and Walnut Cake
नेहमी केकच्या भांड्याला आतून पार्चमेंट पेपर किंवा वॅक्स पेपर लावून घ्यावा. जर पार्चमेंट पेपर नसेल तर भांड्याला आतून बटरचे कोटींग करावे. केक बेक केल्यावर गरम भांडे ओव्हनमधून काढल्यावर ओल्या टॉवेलवर ठेवावे. वाफेमुळे केक भांड्यापासून थोडा सुटेल. किंवा भांड्याच्या कडेने सुरी फिरवावी.
एगलेस स्पंज केक
डेट्स अँड वॉलनट केक

Thursday, April 14, 2011
How to delay ripening of banana?
Store the banana in the refrigerator. The peel will turn black but the banana will not ripen any further.
केळी फ्रिजमध्ये भाज्यांच्या कप्प्यात ठेवावीत. केळ्याचे साल काळे पडेल पण आतील गर लगेच पिकणार नाही.
केळी फ्रिजमध्ये भाज्यांच्या कप्प्यात ठेवावीत. केळ्याचे साल काळे पडेल पण आतील गर लगेच पिकणार नाही.
Saturday, April 9, 2011
How to test frashness of an egg
Put a whole egg into shallow glass of water. A fresh egg will sink at the bottom of glass. About 3 weeks old egg will stand on end. and rotten egg will float to the surface. The reason is - As the egg ages, the air-pockets inside the shell expands till egg becomes light to float.
अंडं बुडेल इतपत पाणी एका ग्लासमध्ये घ्यावे. जर एकदम ताजे अंडे असेल तर ते तळाला बसेल. साधारण ३ आठवडे जुने अंडे असेल तर ते पाण्यात उभे राहते. आणि जर नासके अंडे असेल तर ते पाण्यावर संपुर्णतः तरंगते. याचे कारण जसजसे अंडे जुने होते तसतसे अंड्याच्या आतील हवेच्या पोकळ्या वाढत जातात आणि पाण्यावर तरंगेस्तोवर अंडे हलके होते.

Tuesday, March 29, 2011
Boiling Milk
While boiling milk, always add a little water at the base of the vessel to avoid the milk from sticking at the bottom.
Sago pearls and sevai Kheer
दुध तापवताना, पातेल्याच्या तळाला थोडे (२ ते ३ टेस्पून) पाणी घालून त्यावर दुध ओतावे आणि मग तापवण्यास ठेवावे. यामुळे दुध पातेल्याच्या तळाला चिकटून करपत नाही.
साबुदाणा शेवई खीर
Sago pearls and sevai Kheer
दुध तापवताना, पातेल्याच्या तळाला थोडे (२ ते ३ टेस्पून) पाणी घालून त्यावर दुध ओतावे आणि मग तापवण्यास ठेवावे. यामुळे दुध पातेल्याच्या तळाला चिकटून करपत नाही.
साबुदाणा शेवई खीर
Tuesday, March 15, 2011
Crispy French Fries
To make crispy french fries, soak the potato fingers in the water atleast for 1 hour. Soaking overnight gives more better result. Soaking helps to remove excessive starch.
कुरकूरीत फ्रेंच फ्राईज (फिंगर चिप्स) बनवण्यासाठी, बटाटे उभे कापून किमान १ तास पाण्यात भिजत ठेवावेत. रात्रभर भिजवल्यास जास्त चांगले. यामुळे बटाट्यातील स्टार्च कमी होतो आणि फ्रेंच फ्राईज कुरकूरीत होण्यास मदत होते.

Wednesday, March 9, 2011
Keep noodles separate after boiling
Cook noodles into plenty of boiling water. Once reached to the desired texture, immediately drain hot water and add cold water. It will keep each noodle separate.
Another thing is; after draining hot water, the cooking process continues as the noodles are still hot. Immersing them immediately in cold water stops this prohttp://www.blogger.com/img/blank.gifcess and prevent over-cooking.
Recipe of hakka Noodles
नूडल्स शिजवताना भरपूर उकळते पाणी वापरा. नूडल्स गरजेइतक्या शिजल्या कि गरम पाणी काढून लगेच गार पाण्यात घाला. यामुळे नुडल्स एकमेकांना चिकटणार नाहीत.
तसेच गरम पाणी काढून टाकल्यावर, नुडल्स गरम असल्याने त्या आतून थोड्या जास्त शिजतात. अशावेळी गार पाणी घातल्याने हि शिजण्याची क्रिया थांबते आणि नूडल्स प्रमाणापेक्षा जास्त शिजत नाहीत.
हक्का नुडल्सची रेसिपी

Wednesday, March 2, 2011
Cooking with Spinach
When stir frying the spinach, add a pinch of salt to retain its green color. Also, never cover the pan when cooking spinach.
Spinach Soup
Palak Paneer (Curried Spinach with cottage cheese cubes)
पालक शिजवताना चिमूटभर मिठ घालावे म्हणजे त्याचा रंग न बदलता हिरवागारच राहतो. तसेच पालक शिजताना पॅनवर झाकण ठेवू नये.
पालक सूप
पालक पनीर
Spinach Soup
Palak Paneer (Curried Spinach with cottage cheese cubes)
पालक शिजवताना चिमूटभर मिठ घालावे म्हणजे त्याचा रंग न बदलता हिरवागारच राहतो. तसेच पालक शिजताना पॅनवर झाकण ठेवू नये.
पालक सूप
पालक पनीर
Thursday, February 24, 2011
Storing Cucumber
If cucumber is used half and kept the remaining if the fridge, it spoils very quickly. To increase the life of cut opened cucumber, wrap it in a paper towel and put it in vegetable drawer of the fridge.
Cucumber Pancakes
काकडी अर्धवट वापरून उरलेली फ्रिजमध्ये ठेवली तर ती लवकर खराब होते. अशावेळी उरलेली काकडी पेपर टॉवेलमध्ये गुंडाळून फ्रिजमधील ड्रॉवरमध्ये ठेवावी. जास्त दिवस टिकते.
काकडीचे थालिपीठ
Cucumber Pancakes
काकडी अर्धवट वापरून उरलेली फ्रिजमध्ये ठेवली तर ती लवकर खराब होते. अशावेळी उरलेली काकडी पेपर टॉवेलमध्ये गुंडाळून फ्रिजमधील ड्रॉवरमध्ये ठेवावी. जास्त दिवस टिकते.
काकडीचे थालिपीठ
Monday, February 21, 2011
Prevent avocado browning
Avocados are so delicious and can be eaten sliced or mashed for guacamole. However, the flesh turns brown very quickly. To avoid browning, rub little lemon juice on slices or mix in the guacamole.
Recipe of Guacamole
आवोकाडो हे अतिशय चविष्ट असे फळ आहे. वरील टरफल काढल्यावर आतील गाभा स्लाईस करून नुसता खायलाही छान लागतो तसेच ग्वाकामोले बनवण्यासाठी मॅश करता येतो. परंतु, आवोकाडो कापल्यावर आतील गर हवेच्या संपर्कात आल्यावर लगेच काळा पडतो. ते रोखण्यासाठी आवोकाडो स्लाईसेसवर लिंबाचा रस चोळावा तसेच ग्वाकामोले बनवणासाठी त्यात थोडा रस मिसळावा.
ग्वाकामोलेची रेसिपी

Thursday, February 10, 2011
Storing Green Chilies
Wash the green chilies thoroughly. Spread on a clean cloth. Then pat dry well. Let them stay open for some time, so that they dry completely. Remove the stems. Transfer chilies into a plastic container. Place a tissue paper on top of it. Close the container with lid and put into refrigerator. This way chilies will stay fresh for longer.
हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून, कापडावर पसरवाव्यात आणि थोडयावेळाने उरलेला ओलसटपणा सुती कापडाने पुसून कोरड्या कराव्यात. काहीवेळ हवेवर राहू द्याव्यात. नंतर मिरच्यांची देठं काढून टाकावीत. मिरच्या प्लास्टिकच्या डब्यात भराव्यात आणि वरती कागद ठेवून डबा बंद करावा आणि फ्रिजमध्ये ठेवावा. अशाप्रकारे मिरच्या बराच काळ चांगल्या राहतात. तसेच नंतर वापरताना धुवायची गरज नाही.

Tuesday, February 8, 2011
Leftover Bread
Put the leftover bread slices or bread edges over hot tawa for few minutes to make them crispy. OR after using oven for baking, switch it off and put the bread slices in the oven for few minutes. Let them become crispy. Put Them into a blender and make a fine powder. This powder can be use as a binding for cutlets.
Soya Granules Cutlet
Vegetable Cutlet
ब्रेडचे स्लाईस तसेच ब्रेडच्या कडा उरल्या असतील तर पोळ्या झाल्या कि तव्यावर ठेवावे. तेवढ्या उष्णतेवर चांगले कुरकूरीत करावे किंवा ओव्हनमध्ये बेकिंग झाल्यावर (स्विचऑफ करूनच) ब्रेडचे स्लाईस थोडावेळ ओव्हनमध्ये ठेवावे आणि कुरकूरीत होवू द्यावे. मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घ्यावी. हि पावडर कटलेटमध्ये बांधणीसाठी वापरता येतात.
सोया ग्रॅनुअल्स कटलेट
व्हेजिटेबल कटलेट

Friday, February 4, 2011
How to make flavorful Vegetable stock
To make a good vegetable stock, use aromatic vegetables like carrots, onions, celery, cabbage etc. If you like the flavor of herbs; thyme, basil, parsley, cilantro etc. can be used.
Do not use strong flavored vegetables like broccoli, cauliflower.
Recipes using Vegetable stick
Manchow soup
Vegetable Fried Rice
व्हेजिटेबल स्टॉक बनवण्यासाठी ज्याने स्टॉकला चांगला फ्लेवर व सुवास येईल अशा भाज्या वापराव्या, उदा. गाजर, कांदा, सेलरी, कोबी इत्यादी. तसेच आवडत असल्यास थाईम, बेसिल, पार्सली किंवा कोथिंबीर यासारखे हर्ब्जसुद्धा वापरता येतील.
उग्र चवीच्या भाज्या उदा. ब्रोकोली, फुलकोबी शक्यतो वापरू नये.
व्हेजिटेबल स्टॉक वापरून केलेल्या पाककृती
मनचाव सूप
व्हेजिटेबल फ्राईड राईस

Tuesday, February 1, 2011
Cutting Onion without Tears
Keep the stove flame ON while cutting an onion to avoid tears. Place the cutting board next to a gas range and turn on a burner. Open flame pulls the air and fumes towards itself. So that less fumes reach to the eyehttp://www.blogger.com/img/blank.gifs causing less irritation.
Also, use a sharp knife. It damages less cells which reduces the amount of gas released from the onion.
Onion Pakoda Recipe
कांदा चिरताना गॅस सुरू ठेवावा आणि गॅसच्या शेजारी उभे राहून कांदा चिरावा. विस्तव भोवतालची हवा आणि वायु खेचून घेतो, त्यामुळे कांद्यातून निघणारे व डोळ्यांना झोंबणारे gases डोळ्यापर्यंत पोहोचत नाहीत. अशाप्रकारे अश्रुंशिवाय कांदा चिरता येऊ शकतो.
तसेच धारदार सुरी वापरावी. जेणेकरून कांद्याच्या पेशी कमी प्रमाणात डॅमेज होतील आणि कमी प्रमाणात गॅसेस निघतील.

Friday, January 21, 2011
Cook Onion Faster
To cook onion faster, add 2 to 3 pinches of salt while sauteing (for 1 cup chopped onion). Addition of salt brings out moisture in the onion and speeds up the cooking process
कांदा पटकन शिजण्यासाठी, कांदा परतताना त्यात दोनतीन चिमटी मिठ घालावे (१ कप बारीक चिरलेला कांदा). मिठ घातल्याने कांद्यामधील पाण्याचा अंश पटकन बाहेर पडून कांदा लवकर शिजतो.
कांदा पटकन शिजण्यासाठी, कांदा परतताना त्यात दोनतीन चिमटी मिठ घालावे (१ कप बारीक चिरलेला कांदा). मिठ घातल्याने कांद्यामधील पाण्याचा अंश पटकन बाहेर पडून कांदा लवकर शिजतो.
Thursday, January 20, 2011
Correct way to cook Green vegetables
Green leafy vegetables (like spinach, Fenugreek) lose their bright green color after stir frying. To avoid that, put some salt while stir frying. Also, do not cover the pan while cooking.
Palak Paneer
Methi Malai Matar
परतून केलेल्या पालेभाज्यांचा (पालक, मेथी, हिरवा माठ वगैरे) रंग टिकून राहण्यासाठी परतताना भाजीबरोबरच मिठ घालावे तसेच कढई न झाकता परतावे.
पालक पनीर रेसिपी
मेथी मलई मटर रेसिपी
Palak Paneer
Methi Malai Matar
परतून केलेल्या पालेभाज्यांचा (पालक, मेथी, हिरवा माठ वगैरे) रंग टिकून राहण्यासाठी परतताना भाजीबरोबरच मिठ घालावे तसेच कढई न झाकता परतावे.
पालक पनीर रेसिपी
मेथी मलई मटर रेसिपी
Monday, January 3, 2011
Storing Scraped Coconut
Fill the scraped coconut into a Ziploc bag. Remove the air and zip. Put it into deep freezer. It will stay fresh for atleast 15 days.
Do not press the scraped coconut into the Ziploc bag. Let it be little fluffy. So that, you can break a required amount of piece of frozen coconut. If you press the coconut harshly, you will have to defrost the whole bag. Freezing defrosted coconut will get spoil even in the deep freezer.
Coconut Burfi
Maharashtrian Modak Recipe
नारळ खवल्यावर तो एका झिपलॉकच्या पिशवीत भरून ठेवावा. पिशवीत जर थोडी हवा राहिली असेल तर ती काढून झिप लावावी व पिशवी डिप फ्रिझरमध्ये ठेवावी. खवलेला नारळ १५ दिवस तरी सहज टिकतो.
तसेच, भरताना नारळ खुप चेपून भरू नये. खुप चेपून भरल्यास फ्रिझरमध्ये नारळ खुप कडक होतो आणि जेव्हा थोडासाच नारळाचा चव हवा असतो तेव्हा पूर्ण पिशवी डिफ्रॉस्ट करावी लागते. उरलेला नारळ परत फ्रिझरला ठेवला तर तो टिकण्याची शक्यता कमी होते.
हलक्या हाताने भरलेला नारळ फ्रिजरला टाकला तरीही मोकळा राहतो आणि हाताने लहान तुकडा तोडून घेता येतो.
नारळाच्या वड्या
उकडीचे मोदक

Subscribe to:
Comments (Atom)