Thursday, August 2, 2012

A right way to serve Lettuce.

While making lettuce salad, never chop lettuce leaves with knife. Instead, tear them with hands. Chopping process damages the cells. Damaged lettuce leaves release ascorbic acid oxidase, which destroys vitamin C. Cut edges also discolor quickly.

लेट्यूसची पाने कधीही चिरू नयेत, त्याचे नेहमी हातानेच तुकडे करावेत. चीरल्याने लेट्यूस पानांच्या पेशिंना हानी पोहोचते आणि त्यातील "सी" जीवनसत्त्व नष्ट होते. तसेच चीरल्यामुळे पानांचा करकरीतपणा जातो आणि पाने काळी पडतात.

Monday, July 23, 2012

Tip for homemade Icecream

Ice-creams set faster and better in aluminum containers. Also, place a thick plastic sheet to keep it from sticking to the floor of the freezer.

अल्यूमिनियमच्या भांड्यात आईसक्रीम चांगल्या प्रकारे सेट होते. फक्त भांड्याच्या खाली प्लास्टीकचा जाडसर तुकडा ठेवावा म्हणजे फ्रीजरला भांडे चिकटणार नाही.

Wednesday, July 18, 2012

Tip regarding chopping board


भाज्या  चिरण्यासाठी लाकडी चॉपिंग बोर्ड वापरावा. प्लास्टिक बोर्ड किंवा जाड प्लास्टिक शिटवर भाज्या चीरल्यास प्लास्टिकचे लहान तुकडेही भाजीबरोबर चिरले जावून आपल्या जेवणात येण्याची शक्यता असते.

Use a wooden board to chop. Don`t use a plastic board, small plastic pieces may go with the vegetables.

Wednesday, March 14, 2012

How to make thick green chutney

To get thick and well blended green chutney, add 2 to 3 pieces of boiled potato (peeled) alongwith the cilantro, green chili and water. Blend well. Potato will thicken the chutney.

हिरव्या चटणीला दाटपणा आणण्यासाठी चटणी मिक्सरमध्ये वाटताना २-३ फोडी उकडलेला बटाटा (सोलून) घालावा. यामुळे चटणी घट्टसर होईल. व कोथिंबीर आणि पाणी असे वेगवेगळे राहणार नाही.

Wednesday, February 15, 2012

Leftover refrigerated rice

Refrigerated rice becomes hard and difficult to eat. To make it fluffy, put it in a steel container. Heat a deep medium pan. Add water and the water level should be an inch from the bottom. Once water starts boiling, place the rice container in the middle. Cover the pan and let the rice steam for 7 to 8 minutes.

भात फ्रीजमध्ये ठेवला कि तडतडीत होतो. अशावेळी भात स्टीलच्या भांड्यात काढावा. एका खोलगट पॅनमध्ये तळापासून एक इंचभर पाणी घालून पॅन गरम करावा. पाणी उकळले कि भाताचे भांडे मध्यभागी ठेवावे. वरती झाकण ठेवून भात ७ ते ८ मिनिटे वाफवून घ्यावा.

Wednesday, February 8, 2012

Tip for cooking Okra (bhindi)

Wash and spread Okra on a cotton cloth to air dry it. Let it dry for atleast 4-5 hours before making the sabzi. When we make bhindi sabzi (especially stir fry), bhindi tends to turn soggy. Air-drying bhindi for few hours will prevent the sogginess and sabzi will turn out well.

भेंडीची भाजी जर दुसऱ्या दिवशी सकाळी बनवायची असेल तर आदल्या रात्री भेंडी धुवून कपड्यावर वाळत घालावी. दुसऱ्या दिवशी भेंडी पूर्ण कोरडी झाल्याने भेंडीची भाजी छान होते. आयत्या वेळी धुवून पुसून घेउ नये. भेंडीवर पाण्याचा अंश राहिला तर भाजी मोकळी होत नाही.

How to Remove stickiness of Okra

Wednesday, February 1, 2012

How to keep curry leaves fresh for longer

When you buy curry leaves, take it out from its original packet. keep the leaves intact on the stems. Gently, pat dry with paper towel. Take a ziploc bag and insert a piece of tissue paper. Then put curry leaves into the bag. Zip close the bag. Put it in the refrigerator. Curry leaves won't become dry. They will stay fresh and green for atleast 12 to 15 days. (Change the tissue paper after 3-4 days.)


कढीपत्ता बाजारातून आणल्यावर जर प्लास्टिक पाकिटात असेल तर त्यातून बाहेर काढावा. देठापासून वेगळा करू नये. हलकेच पेपर टॉवेलने टिपून घ्यावा. एक झिप-लॉकची पिशवी घ्यावी. त्यात एक टिश्यू पेपरचा तुकडा आत सरकवावा. आता कढीपत्ता आत घालावा. पिशवी बंद करून फ्रीजमध्ये ठेवावी. कढीपत्ता सुकणार नाही आणि १२ ते १५ दिवस सहज हिरवा आणि टवटवीत राहील. (टिश्यू पेपर दर ३-४ दिवसांनी बदलावा)

Wednesday, January 25, 2012

Preserving Green Mango

Mango is a seasonal fruit. However, you can store green mango (unripe mango) and use it during off-season. Peel the green mango and cut into halves. Remove the stone and grate the flesh. Add a teaspoon of salt and mix. Transfer it to a zip-loc freezer-safe bag and freeze it upto 6 months. When you need it, get the required amount of grated mango and freeze the remaining. Do not add salt as we have already added salt to grated mango
Following are the recipes in which green mango is the main ingredient.

Ambe Dal
Green Mango thin soup
Green Mango Raita

आंबा हे हंगामी फळ आहे. त्यामुळे कैर्‍या नेहमी अवेलेबल असतातच असे नाही. कैरी वर्षभर वापरता यावी म्हणून कैरी सोलून किसून घ्यावी. आतला बाठा काढून टाकावा. किसालेल्या कैरीत १ टीस्पून मीठ घालावे. मिक्स करून झिपलॉकच्या पिशवीत भरून फ्रिझरमध्ये ठेवावे. ६-८ महिने छान टिकते कैरी. आणि विविध पदार्थात वापरता येते. फक्त मीठ कैरीत आधीच घातले असल्याने पदार्थात मीठ घालू नये किंवा चव पाहून लागल्यास मीठ घालावे.

आंबे डाळ
कैरीचे रायते
कैरीचे सार

Wednesday, January 18, 2012

Tip for boiling eggs

Never add eggs into boiling water. First, add them into a pot of cold water, then put this pot on stove. The shell gets cracked if the eggs are added to boiling water.
Boil for 5 minutes to get soft boiled eggs and around 8-9 minutes for hard boiled eggs.

अंडी कधीही उकळत्या गरम पाण्यात घालू नयेत. आधी पातेल्यात गार पाणी घालावे. त्यात अलगद अंडी सोडावीत. आणि आता हे पातेले गॅसवर ठेवावे.
सॉफ्ट बॉइल्ड एग्ज साठी ५ मिनिटे आणि हार्ड बॉइल्ड एग्जसाठी साधारण ८-९ मिनिटे अंडी उकळवावीत.

Sunday, January 15, 2012

Increase life of Red chili powder

To increase shelf life of Red chili powder or Turmeric, add small pieces of hing (khada hing) and keep the the spices in air tight container.

लाल तिखट किंवा हळद साठवणीसाठी भरताना त्यात खडा हिंगाचे लहान तुकडे टाकून ठेवावेत. त्यामुळे लाल तिखट व हळद नेहमीपेक्षा जास्त दिवस टिकते.

Friday, January 6, 2012

Leftover Potato Sabzi

If you have leftover potato sabzi, you can turn it into delicious snacks like Batata wada, Masala Toast Sandwich.

जर बटाट्याची भाजी उरली असेल तर त्यापासून बटाटा वडा किंवा मसाला टोस्ट सॅंडविच बनवू शकतो.

Wednesday, January 4, 2012

Tip for making juices

Sugar takes longer to dissolve in ice-cold water. Hence, use room temperature water when you make juices (eg. lemon juice), dissolve the sugar and then refrigerate. OR add ice-cubes if you want to serve immediately.

फ्रीजमधील थंड पाण्यात साखर विरघळायला वेळ लागतो. त्यामुळे सरबतं बनवताना साध्या पाण्यात आधी साखर विरघळून घ्यावी सरबत बनवावे आणि मग फ्रीजमध्ये ठेवून गार करावे किंवा बर्फाचे तुकडे घालून सरबत प्यावे.