Wednesday, November 30, 2011

Cooking Split lentils (dals)

Older lentils will take longer to cook because they become dry due to loss of moisture. In such case, soak lentils in water for an hour before pressure cooking. Pre-soaking reduces cooking time too.

जुन्या डाळी (शक्यतो चणा किंवा तूर डाळ) जास्त कोरड्या झाल्याने चटकन शिजत नाहीत. अशावेळी डाळ शिजवण्यापुर्वी तासभर पाण्यात भिजत ठेवावी. डाळ भिजवल्याने प्रेशर कुकरमध्ये नेहमीच्या वेळेपेक्षा डाळ पटकन शिजते.

Thursday, November 24, 2011

Prevent Curdling of yogurt in cooking

Bring the yogurt to room temperature before using. To temper or help stabilize the yogurt, you can stir in corn starch or all purpose flour (Rice flour or Chickpea flour in Indian cooking) in every 1/3 cup of yogurt. For best result, gently stir yogurt rather than beating it, and add it over low heat at the end of cooking.

कुठल्याही रेसिपीमध्ये दही वापरायचे असल्यास आधी दही रूम टेम्परेचरला आणावे. गरज वाटल्यास १/३ कप दह्यात, रेसिपीला अनुरूप असे १ टीस्पून पीठ घाला (कॉर्न स्टार्च, मैदा, तांदुळाची पिठी, किंवा बेसन) घालावे. दही जोरजोरात फेटण्याऐवजी हलकेच मिक्स करा आणि पदार्थ मंद आचेवर ठेवून रेसिपीच्या शेवटी दही त्यात मिक्स करा.

Wednesday, November 16, 2011

Using Raw Onion in recipes

If you are using raw onion in any recipe (eg. salsa or guacamole) and you are not going to eat that food in the next 15-20 minutes, then rinse the diced onion with cold water and blot dry. This will rid them of sulfurous gas that can ruin dish.

कोणताही पदार्थ बनवताना त्यात कच्चा कांदा वापरणार असाल (उदा. सालसा, ग्वाकामोले) आणि बनवल्यावर जर १५-२० मिनिटात तो खाणार नसाल तर, आधी चिरलेला कांदा गार पाण्याखाली हलकेच धुवून घ्यावा. आणि पेपर टॉवेलने टिपून घ्यावा. कच्च्या कांद्यामधील सल्फरस गॅसमुळे पदार्थ बराच काळ तसाच ठेवल्यास पदार्थाची चव बिघडते. कांदा धुवून घेतल्याने हि शक्यता संभवत नाही.

Wednesday, November 2, 2011

Care to take while Handling Chilies

Before you chop chili peppers, rub a little vegetable oil into your hands and your skin won’t absorb the spicy chili oil.

मिरची चिरताना जर हाताची जळजळ होत असेल तर मिरची चिरायच्या आधी बोटांना थोडे तेल लावून घ्यावे. यामुळे मिरचीमधील तिखटपणा त्वचेच्या थेट संपर्कात येणार नाही.