Wednesday, September 28, 2011

How to store Chicken

Keep the chicken in it's original packaging and store it in the coldest part of the refrigerator (bottom, towards the back) for no more than one or two days. If you are not planning to eat it within two days, freeze it in it's original packaging.

चिकन फ्रीजमध्ये स्टोअर करताना त्याच्या मूळ सीलबंद पॅकेटमध्येच असू द्यावे आणि फ्रीजमधील एकदम थंड जागी ठेवावे(तळाच्या कप्प्यात मागील बाजूस). एक ते दोन दिवसात चिकन वापरात आणावे. जर १-२ दिवसात वापरायचे नसल्यास लगेच फ्रीजरमध्ये फ्रीज करावे.

Wednesday, September 21, 2011

How to Store Soup

Almost all soups can be stored in Freezer. If the soup will contain any dairy product like milk, yogurt, cream, cheese etc, skip it when you make the soup because these ingredients can separate when thawed.
Cool the soup before transferring to freezer-safe airtight plastic containers. Leave some space for expansion. Label the date and freeze upto 3 months.

जवळजवळ सर्वच प्रकारची सूप्स फ्रीजरमध्ये स्टोअर करता येतात. सूपमध्ये जर दुग्धजन्य पदार्थ घालणार असाल जसे चीज, दुध, क्रीम, किंवा दही तर ते न घालता सूप बनवावे. कारण फ्रीजरमधील गोठलेले सूप वितळवताना हे पदार्थ सेपरेट होतात.
सूप फ्रीजरमध्ये ठेवण्यापूर्वी ते पूर्णतः गार होवू द्यावे. नंतर फ्रिजरमध्ये चालतील असे एअरटाईट प्लास्टिक कंटेनरमध्ये सूप भरावे. सूप गोठल्यावर प्रसारण पावेल म्हणून एकदम वरपर्यंत सूप भरू नये. थोडी जागा मोकळी सोडावी. कंटेनरवर तारीख घालावी. ३ महिन्यांपर्यंत सूप वापरात आणावे.

Thursday, September 15, 2011

How to choose an Eggplant

Lift several eggplants of the same size and choose the heaviest one. Gently press on the flesh. The ripe one will spring back. If the dent remains where you had pressed, it is stale. Skin should be purple and glossy, firm and smooth. The green caps and stems should be intact and mold free.

वांगे निवडताना आधी सारख्या आकाराची वांगी हातात घेउन वजनाचा अंदाज घ्यावा. जे जास्त जड लागेल असे वांगे निवडावे. अंगठ्याने (नख लावू नये) हलकेच वांग्याला थोडे दाबून पहावे. जर स्पंजप्रमाणे दबलेला भाग मुळपदावर आला तर वांगे नीट पिकलेले व ताजे आहे. आणि जर दाबल्या ठिकाणी डेंट तसाच राहिला तर वांगे शिळे आहे असे समजावे. वांग्याची पाठ जांभळी आणि तकाकदार असावी. तसेच गुळगुळीत आणि फर्म असावी. हिरवा टोपीसारखा भाग आणि शेंडी अखंड असावी आणि त्यावर बुरसा आलेला नसावा.

Wednesday, September 7, 2011

How to bake food evenly

Most ovens heat unevenly. Try rotating baking pans from top to bottom and front to back atleast once during baking time.

बराचशा ओव्हनमध्ये सर्वत्र सारखी उष्णता निर्माण होत नाही, पदार्थ अनइव्हन बेक होतो. तेव्हा बेक करताना बेकिंग पॅन एकदा तरी रोटेट करावा. म्हणजे पदार्थ सारखा बेक होईल.